Published June 3, 2023

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार ‘सर्वसामान्यां’चे सरकार असा घोषा लावत असले तरी, प्रत्यक्षात अनेक प्रश्नांची तड अद्याप लागलेली नाही. त्यातच राजकारणातील आरोप-प्रत्यारोपांनी सभ्यतेची पातळी सोडल्याचे आता ठळकपणे अधोरेखित झाली आहे.

राज्यात एकीकडे पुढाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची धुळवड रंगलेली असतानाच दुसरीकडे ज्यांचे नाव घेऊन राजकारण केले जात आहे, तो मात्र उद्विग्न होऊन टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. यावर्षीच्या जानेवारी ते एप्रिल या अवघ्या चार महिन्यांत तब्बल 830 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दिवसाला जवळपास सात शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात, हे धक्कादायक आहे.

आता प्रत्येकाला आगामी निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नोकरदार यांच्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही, असे चित्र आहे. शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलेले असतानाही ना महाविकास आघाडी सरकार अन् ना शिंदे-फडणवीस सरकार, दोघांकडूनही पोकळ आश्वासन दिले जात आहे.

गेल्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांच्या तुलनेत यंदाची आकडेवारी कमी दिसत असली तरी, आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसते. गेल्यावर्षी 945 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले होते. त्यातही मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये पहिलल्या चार महिन्यांत 280 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यावर्षी याच काळात 305 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले.

राज्यात 830 शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी 283 प्रकरणेच आर्थिक मदतीच्या निकषांत दाखविली गेली. कर्जबाजारीपणाशी संबंधित प्रकरणांमध्येच सरकारकडून आर्थिक दिली जाते. अशा शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत दिली जाते. आकडेवारीनुसार केवळ 12 टक्के प्रकरणांमध्ये ही रक्कम आदा करण्यात आली आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023