कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज भारतीय हवामान वेधशाळेने येणाऱ्या ४ दिवसात म्हणजेच ५ ते ८ जुलैच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे माझी सर्व कोल्हापूकरांना विनंती आहे की, अतिवृष्टी सदृश पावसामुळे दुर्देवी घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा. असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

आ. सतेज पाटील म्हणाले की, आज (मंगळवार) सायंकाळी सातवाजता जिल्ह्यातील २२ बंधारे पाण्याखाली आहेत. तर राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी २७ फूट २ फुटांपर्यंत गेली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे सर्व उपायोजना करण्यात आल्या आहेत. तरी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. काही सखल व नदीकाठी असलेल्या भागांमध्ये पाणी वाढल्यास प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षित स्थळी तात्काळ स्थलांतरित व्हावे. पूरपरिस्थितीत कोणतीही मदत हवी असल्यास तात्काळ खालील फोनवर संपर्क करावा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले.

आ. सतेज पाटील संपर्क क्रमांक : ९८२३० १२९०५, आ. ऋतुराज पाटील ९७६४४ ९५९९९, आ. जयश्री जाधव ९५५२० ७३१००, अजिंक्यतारा कार्यालय ०२३१-२८५३२८८-८९-९० असे आहेत.