Published November 18, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘सरकारने केलेल्या लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाचे पैसे आम्ही भरणार नाही. सरकारमध्ये दम असेल तर आमच्याकडून वीज बिलाची वसूली करुनच दाखवावी, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

ते म्हणाले, ‘राज्य सरकारने वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वीज बिलं माफ केली नाहीत तर शेतकऱ्यांसह विविध स्तरातील लोक रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक भागांतील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना विजेची बिले भरमसाट आली होती. घरगुती विजेचे तीन महिन्यांचे बील सरकारने माफ केलीच पाहिजे. याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. वीजेचे बिल सामान्य माणूस कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही. हे मी ठामपणे सांगतो. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकांकडून बिल वसूल करून दाखवावेच.’

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023