वीज कनेक्शन कापायला आल्यास शॉक देऊ

0
41

ठाणे (प्रतिनिधी) : वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. वीजबिलच्या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यात वीजबिल न भरल्याने वीज कापायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाइलने शॉक देऊ, असा इशाराच मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

ते म्हणाले, लॉकडाउन दरम्यान जनतेला आलेले वाढीव वीजबिल माफ व्हावे यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली. काहीवेळा आमच्या कार्यकर्त्यांनी कायदाही हातात घेतला. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनाही याबाबत पत्र लिहीले. पण त्यावर अद्याप काहीच तोडगा निघालेला नाही. ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असे जाहीर केले. जर लोकांकडून बळजबरीने वीजबिल घेतले जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा.