गडहिंग्लज (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे देशातील बळीराजा आक्रमक बनला असल्यामुळे रस्त्यावर उतरला आहे. आणि अश्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविरुद्ध अपशब्द वापरल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

याचा निषेध करण्यासाठी गडहिंग्लज शिवसेनेच्या वतीने दसरा चौक येथे रावसाहेब दानवे यांची प्रतिमा असलेल्या फलकाचे दहन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दिलीप माने म्हणाले, ‘केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. आणि त्यांच्याच पक्षाचे लोक शेतकऱ्यांना अपशब्द वापरत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही. आज आम्ही फक्त फलक दहन करत आहोत. जर परत असे काही घडले तर यापेक्षा उग्र आंदोलन करू’, असा इशारा देखील त्यांनी केंद्र सरकारला दिला. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.