आरक्षणासाठी गरज पडल्यास घटनेत बदल करू : संभाजीराजे छत्रपती

पंढरपूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आरक्षणाचा विषय हा मुख्यत्वे राज्य सरकारचा आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारची मदत घेऊन गरज असेल तर घटना देखील बदलण्याचा अभ्यास करू, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. लवकरच राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पंढरपूर येथे बोलत होते.

खा. संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी सरकारने जोर लावावा. आम्ही सर्वतोपरी त्यांना मदत करू. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने तात्काळ मदत द्यावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितेले.

Live Marathi News

Recent Posts

राजारामपुरी, दौलतनगर परिसरातून सर्वाधिक थकीत पाणी बिलाची वसुली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरी, टाकाळा आणि…

1 hour ago

राज्यपाल नियुक्त आमदारकीत सदाभाऊ खोतांची कुरघोडी..

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने…

1 hour ago

चंद्रकांतदादांना कुणी सांगितले आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली?

कराड (प्रतिनिधी) : चंद्रकांतदादांना कुणी सांगितले…

2 hours ago

महापालिकेच्या उपायुक्त, सहायक आयुक्तांनी केले प्लाझ्मादान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त…

2 hours ago

प्रचारासाठी माझ्या फोटोचा वापर करू नका : खासदार संभाजीराजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर आणि…

3 hours ago

आयटीआय निदेशक संघटना, ‘फेम’चा जयंत आसगावकर यांना पाठिंबा

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र राज्य आयटीआय…

4 hours ago