‘टांग’ वर झाल्यास भूमंडळ हालते : संजय राऊतांचा भाजपवर पलटवार

0
65

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. बिहार निवडणुकीत नोटापेक्षाही कमी मते शिवसेनेला मिळाली. शिवसेनेची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी आहे, या भाजपच्या टीकेचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आमची टांग नेहमी जागेवरच असते. जेव्हा आम्ही टांग वर करतो तेव्हा भूमंडळ हलते, असा इशारा शिवसेना नेते राऊत यांनी दिला आहे.

बिहारच्या निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. भाजप आणि शिवसेनेत आरोप, प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामुळे निवडणूक बिहारची झाली तर महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गरम झाले आहे.