देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल, तर त्यांचं कौतुक करतो : संजय राऊत

0
21

मुंबई (प्रतिनिधी) : सामना वाचतात, हे फडणवीस यांनी कबूल केले. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल, तर मी त्यांचं कौतुक करतो, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला दिले आहे.

शिवसेनेचा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आलं आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यावर राऊत यांनी उत्तर दिले आहे. तर भाजप नेते सुधीर मनगुंटीवार यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन महिन्यात सरकार येईल असं म्हटलं आहे. चांगला विनोद करतात ते. लवकरच महाराष्ट्रातील चित्रपटगृह सुरु होत आहेत. आत्ताच मला काही प्रमुख नाट्य निर्मात्यांचा फोन आला होता. त्यांना काही सूट हवी आहे. मला काही गरज वाटत नाही,  सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील,  असा टोला राऊत यांनी लगावला.