दिंडेवाडी येथील संजय गुरव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
57

पिंपळगाव (प्रतिनिधी) :  दिंडेवाडी (ता.भुदरगड ) येथील प्राथमिक शिक्षक संजय यशवंत गुरव यांना आनंदगंगा फौंडेशनच्या वतीने (मिणचे ता.हातकणंगले)  जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. अतिग्रे येथील  संजय घोडावत विद्यापीठात पार पडलेल्या वितरण सोहळ्यात माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शैक्षणिक क्षेत्रात राबवलेले विविध उपक्रम,  मोठ्या प्रमाणात केलेला शैक्षणिक उठाव, ई लर्निग सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,  बोलका व्हरांडा,  स्वच्छ सुंदर हिरवी शाळा,  राजर्षी शाहू अभियान,  दत्तक पालक योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम इत्यादी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.

यावेळी जि.प.चे शिक्षण समिती सभापती प्रविण यादव,  हातकणंगले पं.स.चे सभापती प्रदीप पाटील,  गटशिक्षणाधिकारी प्रविण फाटक, घोडावत विद्यापीठाचे प्राचार्य विराट गिरी,  फौंडेशनचे प्रमुख तानाजी पवार व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आदी  उपस्थित होते.