इचलकरंजीत कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी बैठक

0
67

इचलकरंजी (प्रतिनिधी): कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावे, न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, सोशल डिस्टन्सचे पालन होते की नाही, यावर प्रशासनातर्फे वॉच ठेवणे, आदी निर्णय प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात अध्यक्षस्थांनी होते. आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लग्न समारंभाच्या ठिकाणी प्रशासनातर्फे गोपनीय व्हिडिओ करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे,
खाजगी क्लासेस, लग्नसमारंभ, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय अशा सर्व ठिकाणी अचानक भेट देऊन गोपनीयपणे माहिती घेणे,
कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी तथा अप्पर तहसीलदार शरद पाटील तसेच पालिका, पोलिस, महसूल खात्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.