इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजी येथे आज (गुरूवार) भिमशक्ती सामाजिक संघटनेनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कोरोना काळातील लाईट बील आणि रेशनकार्डधारक विरोधी निणर्य मागे घ्यावा, असे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील कामगार, गोरगरीब नागरिकांचा उदरनिर्वाह रेशनधान्यावर अवलंबून असते. त्यामुळे राज्य सरकारने रेशन कार्ड धारकां विरोधात निर्णय घेतला आहे. हा निर्णय अनेक कुटुंबावर घाला घालणार ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या रेशनकार्डमध्ये कोणताही बदल करू नये, अशी मागणी केली. कोरोनाच्या काळात उद्योग बंद असल्याने उत्पन्नाचे साधन नव्हते. यासाठी राज्य सरकारने वीज बिल माफ करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे. या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्वरित निर्णय घ्यावा आणि वीज बिल माफ करावे, अन्यथा सरकारला भिमटोला दाखविण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते, सुनील जावळे, नरेश नगरकर, झाकीर जमादार, रवि पाटोळे, लक्ष्मी गारवे, चंद्रकांत कांबळे, जयवंत वडर, मारुती जावळे, संगीता खारगे, राहुल जावळे, शशी लाखे, रवी लोंढे, अरुण कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.