इचलकरंजीत बेशिस्तांवर बडगा

0
75

इचलकरंजी (प्रतिनिधी): येथील नगरपालिका प्रशासनाकडून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचे उपाय राबवले जात आहेत. कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. यातर्गंत शनिवारपासून शहरात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

इचलकरंजी शहर कोरोना महामारीचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते. मध्यंतरीच्या काळानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवून जनजीवन सुरळीत झाले होते. पण गेल्या काही दिवसांपासून शहरात पुन्हा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी २६ पथके कार्यरत करण्यात आली आहे.
बाहेर गावाहून गावात येणे किंवा गावातून बाहेर गावी जाणा-या नागरिकांवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. त्यामुळे शहराच्या प्रवेशव्दारावर या पथकांमार्फत विना मास्क फिरणा-यांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.