इचलकारंजीच्या शांतीनगर भागात कचरा कुजून दुर्गंधी

0
23

इचलकारंजी (प्रतिनिधी) : शांतीनगर भागातील कब्रस्तान रोड येथील कचरा कुजून दुर्गंधी सुटलेली आहे. त्यामुळे अनेक रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील कचरा उठाव होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

भागातील सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी यांचे या कचरा कुंडीकडे दुर्लक्ष होत असल्याने महानगरपालिकेत वारंवार निवेदन देऊन देखील कोणतेही कारवाई होत नाही. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी या पुढे आरोग्याची समस्या आणखीन गंभीर होण्यापूर्वीच तातडीने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.