इचलकरंजीत ‘कोरोना पॉझिटिव्ह’ मुलीचा विवाह सोहळा : गुन्हा दाखल

0
1406

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे आज (रविवार) एका कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या नवरी मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी नगरपलिकेच्या आरोग्य विभागाने या लग्न सोहळ्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

या नवरीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच या लग्नामध्ये शासनाने दिलेल्या नियमनुसार अधिक लोक उपस्थित होते. कोरोना संदर्भातील शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा विवाह सोहळा सुरू होता. पालिकेच्या आरोग्य विभागाने यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केला गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महेश सेवा समितीच्या व्यवसाथपकसह दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या लग्नाला उपस्थित असणारे नागरिक आणि नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनातर्फे सुरु आहे.

ही कारवाई मुख्याधिकारी शरद पाटील यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत संगेवार, मुख्य स्वच्छता निरीक्षक सुर्यकांत चव्हाण, संजय भोईटे, तानाजी कांबळे यांच्या पथकाने केली.