इचलकरंजी पालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करणार : खा. धैर्यशील माने

0
117

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी तत्पर आहे. नगरपालिकेच्या सर्व शाळा डिजिटल करून विद्यार्थ्यांना अद्ययावत, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन खा. धैर्यशील माने यांनी केले. ते आज (शुक्रवार) इचलकरंजी पालिकेच्या स्वागत कमानीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

खा. माने म्हणाले की, पालिकेच्या सुमारे ७७०२ शाळा डिजिटल करत असताना सुमारे २९५ शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात भर राहील.

या प्रसंगी नगराध्यक्ष सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे, नगरसेवक रवींद्र माने यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, मराठा महासंघाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.