इचलकरंजी नगरपालिकेची हॉटेल सिटीईनवर कारवाई…

0
672

इचलकरंजी (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या काळात राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांना घरपोच पार्सल देण्यासाठी परवानगी दिली आहे.  इचलकरंजी येथील छ. शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन रोडवर असणाऱ्या हॉटेल सिटीईन शेजारी कोरोना प्रतिबंधित क्षेत्र असताना देखील खुलेआम पार्सलच्या नावाखाली आतमध्ये बसून लोकांना नाष्टा देत होते. आज (सोमवार) पालिकेच्या जप्ती पथकाने या हॉटेलवर धाड टाकून तेथील सामान जप्त करण्याची कारवाई केली.