इचलकरंजी नगरपरिषदेची स्वच्छ सर्वेक्षण कार्यशाळा संपन्न…

0
111

इचलकरंजी (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण २०२१अंतर्गत इचलकरंजी नगरपरिषदेमार्फत आज (बुधवार) शहरातील कार्यरत सर्व प्रभाग कमिटी, आरोग्य विभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक व वाँर्ड निरीक्षक ,सफाई कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेची सुरुवात नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संजय केंगार तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते रोपट्यांना पाणी देऊन करण्यात आली.

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत घरोघरी लावण्यात येणाऱ्या स्टिकरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांनी मार्गदर्शन  केले. स्वच्छ सर्वेक्षणास आपली कोणती तयारी मुख्यत्वे गरजेची आहे ,याबद्दल नोडल ऑफिसर विश्वास हेगडे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या इचलकरंजी शहरास आणखी उच्चांक गाठणेसाठी अवश्यक त्या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन सिटी को – ऑर्डिनेटर प्रवीण बोंगाळे यांनी केले.

मुख्य स्वच्छता निरीक्षक विजय पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रभागामध्ये प्रत्यक्ष काम करण्याबद्दल मार्गदर्शन केले. वॉर्डातील उत्कृष्ठ सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार नगराध्यक्षा, संजय केंगार, नगरसेवक, नगरसेविका यांच्या हस्ते पार पडला. शेवटी स्वच्छतेची शपथ व माझी वसुंधरा शपथ ग्रहण होऊन कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळेमध्ये नगरसेविका वर्षा जोंग, स्मिता तेलनाडे,आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, शहर समन्वयक अधिकारी प्रविण बोंगाळे, जय डॉ. शशांक वळवाडे, प्रतीक आलासे,सोहेल खान,साहिल मुल्ला, स्वच्छता निरीक्षक,कर्मचारी उपस्थित होते.