इचलकरंजीत मनसे वाहतूक सेनेचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन…

0
67

इचलकरंजी (प्रतिनिधी) : वाढती महागाई आणि इंधनदराने वाढीने सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल इंधनावरील कर कमी करावा,अशी मागणी मनसे वाहतूक सेनेच्या वतीने आज (गुरुवार) प्रांताधिकाऱ्यांना निवदेनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य जनता आता  सावरत आहे. असे असतानाच पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढले आहेत.त्यामुळे पुन्हा सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने भरडली जात आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच राज्य सरकारने इंधनावरील कर कमी करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे वाहतूक सेनेच्या वतीने निवेदनाव्दारे देण्यात आला.

यावेळी मनसेचे जिल्हा सचिव यतिन होरणे, शहराध्यक्ष प्रताप पाटील, शहराध्यक्ष विश्वास बचुटे, सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी, योगेश शिंदे, नितीन मगदूम, बाबुराव चव्हाण, महेश शेंडे, नितीन घायतिडक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.