इचलकरंजीतील जयहिंद मंडळाच्या खेळाडूंची भारतीय खो-खो संघात निवड…

0
72

इचलकरंजी (प्रतिनिधी) : भारतीय खो-खो संघाच्या मान्यतेने  हरियाणातील फरिदाबाद येथे अल्टिमेट खो-खो सराव शिबीर घेण्यात येत आहे. यामध्ये इचलकरंजीतील जयहिंद मंडळच्या अमित पाटील, अभिजित पाटील, विजय हजारे, रोहन शिंगाडे, सागर पोतदार या पाच खेळाडूंची निवड झाली आहे. तसेच प्रशिक्षक म्हणून सुनील कुचेकर यांची निवड झाली होती.

या सराव शिबीरानंतर दिल्ली येथे झालेल्या पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये भारतीय ब संघात आमित पाटील, आभिजित पाटील, विजय हजारे आणि रोहन शिंगाडे या चार खेळाडूंची निवड झाली. भारत अ आणि भारत ब संघाच्या प्रदर्शनीय सामन्यात भारत ब संघ विजयी झाला.