इचलकरंजी बसस्थानकाला छ. शिवाजी महाराजांचे नाव द्यावे : आ. प्रकाश आवाडे

0
66

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकाला छ. शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्‍नी तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या गुढीपाडव्यापर्यंत शिवप्रेमी त्याठिकाणी गुढी उभारतील. तसेच कॉ. मलाबादे चौकाचे नाव न बदलता छ. संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात यावा,  अशी मागणी आ. प्रकाश आवाडे यांनी केली आहे.

यावेळी आ. आवाडे म्हणाले की, मध्यवर्ती बसस्थानकाला छ. शिवाजी महाराज यांचे नांव द्यावे अशी मागणी प्रदीर्घकाळापासून प्रलंबित आहे. या संदर्भात ठिय्या आंदोलनही छेडले होते. त्याची दखल घेत मंत्रीमहोदयांनी या प्रश्‍नी बैठक घेऊन निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. पण अद्याप त्या संदर्भात काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे या प्रश्‍नी गुढीपाडव्यापूर्वी निर्णय व्हावा अन्यथा त्यादिवशी शिवप्रेमी त्याठिकाणी गुढी उभारतील. त्याचबरोबर कॉ. के. एल. मलाबादे चौकाचे नाव न बदलता या चौकात छ. संभाजी महाराज यांचा पुतळा उभारावा. यासाठी सरकारी दरबारी मीसुध्दा प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आवाडे यांनी दिली.

यावेळी माजी आ. राजीव आवळे,  माजी पं.स. सभापती महेश पाटील, बाळासाहेब कलागते, राजू मगदूम, राकेश मगदूम, किरण माने, मिलिंद गवळी, रणजित शिंदे, अनिकेत कानुगडे, संतोष सावंत आदी उपस्थित होते.