इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा : १२ जणांना अटक

0
144

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील षट्‌कोण चौकातील बाळनगर येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून १२ जणांना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी बाबू देवडी, शंकर चौगुले, प्रकाश चौगुले, श्रीकांत हावळ, आनंद भराडे, राजू पाटील, इम्रान शेख, शिवानंद चौगुले, गणेश भिसे, विरूपाक्ष कोष्टी, दत्तात्रय गाणबोले, महेश धुमाळ (सर्व जण रा. इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ मोटारसायकल, ८ मोबाईल आणि १३ हजार ५०० रोख रक्कम असा एकूण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील पाटील, सागर हारगुले, जावेद आंबेकारी, सदाम शेख यांनी सहभाग घेतला.