इचलकरंजीत जन्मोत्सव सोहळा

0
131

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथे शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते छत्रपतीच्या आश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी उद्यान येथे जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.

भारतीय जनता पार्टी शहर कार्यालय, मराठा मंडळ संतमळा आदी ठिकाणी नगराध्यक्षानी भेटी देऊन सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, प्रांताधिकारी विकास खरात, अप्पर तहसीलदार तथा इचलकरंजी मुख्याधिकारी शरद पाटील, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, जेष्ठ नगरसेवक मामा जाधव, महिला बाल कल्याण सभापती सारिका पाटील, बांधकाम सभापती उदयसिंह पाटील, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, नगरसेविका संगीता आलासे, नगरसेवक मनोज हिंगमिरे, नगरसेवक युवराज माळी, रवींद्र लोहार, माजी बाधंकाम सभापती भाऊसो आवळे आदी उपस्थित होते.