…तोपर्यंत गळ्यात हार घालणार नाही : पंकजा मुंडेंचा निर्धार  

0
196

बीड (प्रतिनिधी) : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही,  तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही,  अशी प्रतिज्ञा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि नेत्या पंकजा मुंडे  यांनी केली आहे. बीडमधील भाजप समर्थ बूथ अभियानाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी  ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा समाजाच्या आरक्षणाचा आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्‍न निकाली लागत नाही, तोपर्यंत हारतुरे घेणार नाही. तसेच  फेटा ही बांधणार नाही.  जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही. तोपर्तंय गळ्यात हार नको. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तो पर्यंत मला कोणी फेटा बांधायचा नाही, असा निर्धार पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.