मी मतदार कोल्हापूर घडवणार ! : भारतीय संविधान मंचचा अनोखा उपक्रम

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) संक्रांतीचे औचित्य साधून बिंदू चौकामध्ये भारतीय जन सविधान मंचाच्या वतीने नागरिकांना परिवर्तनाचा तिळगूळ वाटत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सक्षम उमेदवार निवडून देण्याचा संकल्प करण्यात आला. याकरिता नागरिकांना संविधान मंचतर्फे व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले आहे. शहराच्या विकासासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन यावेळी मंचचे राज्य समन्वयक पारस ओसवाल यांनी केलंय.

या वेळी महापालिका निवडणूक ही जनतेसाठी असल्याने सर्व पक्षांनी सक्षम उमेदवार द्यावेत, उमेदवारांनी कमी खर्चात निवडणूक लढवावी, शहराचे १० वर्षातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, शहराच्या विकासासाठी सभागृहातील विषयांना विरोध करू नये, महापालिका सभागृहात शिक्षण, आरोग्य यासह अनेक योजनांना प्राधान्य देण्यात यावेत अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मंचचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.