घरात घुसून मारेन : शिवसेनेच्या महिला खासदाराची भाजप आमदाराला धमकी

0
282

वाशिम  (प्रतिनिधी) : शिवसेना  खासदार  भावना गवळी  आणि  भाजप  आमदार राजेंद्र पाटणी यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. खासदार  गवळी यांनी  भाजप  आमदाराला थेट घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. या घटनेचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे  वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आमदार, खासदाराची ही खडाखडी नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अखेर उपस्थित नेत्यांनी त्यांच्यातील तंटा मिटवला.  २६ जानेवारी रोजी खासदार  भावना गवळी  व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर भाजपाच्या वतीने पाटणी चौकामध्ये आंदोलन  करण्यात आले. त्यामुळे शहरातील दुकानदारांनी घाबरून आपली दुकाने बंद केली. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.  खासदार गवळी  व आमदार यांच्यामध्ये  पूर्वीपासूनच मतभेद  आहेत. त्याचा प्रजासत्ताक दिनी कडेलोट झाला.