मुंबई (प्रतिनिधी) :  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम कौन बनेगा करोडपती सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन हे करत आहेत. सध्या कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होत आहेत. त्याच प्रमणे पत्रकार वैष्णवी कुमारी या ‘कौन बनेगा करोडती-१४’ च्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या  प्रोमोमध्ये वैष्णवी कुमारी यांनी बिग बींना काही प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने अनेकांचे लक्ष वेधले,  वैष्णवी कुमारी हिने मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. असे अमिताभ बच्चन यांना म्हणताच. ते म्हणाले,  ‘मला पत्रकारांची भिती वाटते. मला पुढच्या जन्मी पत्रकार व्हायचे आहे ज्यामुळे मी लोकांना प्रश्न विचारु शकतो.