कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर पोलीसांनी एसटी गँगवर केलेल्या मोक्का कारवाईमध्ये शाहूनगर (वड्डवाडी), राजारामपूरी येथील रोहीत चंद्रकांत साळोखे (वय २२) या युवकाला काही संबंध नसताना अडकवला आहे. त्यामुळे त्याची फेर चौकशी करावी. आणि त्याची सुटका करून त्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा. अशी मागणी मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, दि.४ एप्रिल रोजी शाहू टोलनाका येथे झालेल्या मारामारीच्या गुन्ह्यात रोहीतला अडकवले आहे. फिर्यादी सद्दाम अब्दुल सत्तार मुल्ला याने आला या घटनेशी रोहीतचा कसलाही संबंध नाही. याबाबत आम्ही कोर्टात साक्ष देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे रोहीतचा पुन्हा एकदा नव्याने पार्श्वभूमी पडताळून रोहीत गुन्हेगार प्रवृत्तीचा नाही याची खातरजमा करावी. आणि त्याच्या कुटुंबाला न्याय द्यावा.

असे न झाल्यास मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेतर्फे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष शशिकांत वाटेगावकर, कोल्हापूर शहराध्यक्ष संजय शिंगाडे, पन्हाळा तालुकाध्यक्ष सुरेश वडर, सुरेश साळोखे, पदाधिकारी उपस्थित होते.