मी भाषण केले, पण मला गुन्हा मान्य नाही : राज ठाकरे

0
87

नवी मुंबई (प्रतिनिधी) : मी भाषण केले आहे, मात्र मला गुन्हा मान्य नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) वाशी न्यायालयासमोर सुनावणीदरम्यान सांगितले. दरम्यान, वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. 

या खटल्यात सुनावणीला सुरुवात करण्यासाठी राज ठाकरे यांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर झाले असता त्यांना जामीन मंजूर केला. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ५ मे रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांना पुन्हा न्यायालयात हजर राहण्याची गरज नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.