आईची शिकवण माहीत नाही, जान २७ वर्षे माझ्यासोबत राहत नाही : कुमार सानू

0
56

मुंबई (प्रतिनिधी) : माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही. गेली २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो, असे जान कुमार सानू याचे वडील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी म्हटले आहे.

कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने ‘बिग बॉस १४’च्या घरात मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर कलर्स वाहिनी, जान सानूच्या आईने आणि स्वत: जान सानूने माफी मागितल्यानंतर आता त्याचे वडील कुमार सानू यांनी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली आहे.

एका व्हिडीओद्वारे कुमार सानू यांनी मुलाच्या चुकीबद्दल माफी मागितली आहे. गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिले आहे. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही, असे कुमार सानू यांनी म्हटले आहे.