‘मी चाललोय’…: मोबाईलला स्टेट्स ठेऊन गडहिंग्लजमध्ये पोलिसाची आत्महत्या

0
7473

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कौटुंबिक कारणातून चंदगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. रामदास अशोक गस्ती (वय ३४, रा.बसर्गे ब्रु, ता.गडहिंग्लज) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नांव आहे. याबाबत कांचनकुमार बाबूराव गस्ती यांनी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रामदास गस्ती यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवरील स्टेट्सला ‘मी चाललोय’ असा मजकूर टाकल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.             

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर पोलीस दलात चंदगड पोलीस ठाण्यात रामदास गस्ती पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. मागील अनेक दिवसांपासून ते कामावर गैरहजर राहत होते. पत्नी आणि त्यांच्यामध्ये वाद झाल्याने पत्नी मुलासह माहेरी राहत आहे. त्यामुळे ते नैराश्यातून व्यसनाधीन बनले होते. दरम्यान, १२ मार्चरोजी घराबाहेरील सोप्याच्या धाब्याच्या लोखंडी हुकाला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन रामदास गस्ती यांनी आत्महत्या केली.