मी माणसे जोडणारा कार्यकर्ता : भरमू आण्णा पाटील

0
67

चंदगड (प्रतिनिधी) : माणूसकी जपून तालुक्यात विकासगंगा आणली आणि माणसे जोडत गेलो. जी.प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम मार्गी लागल्याचे, माजी राज्यमंत्री भरमू आण्णा पाटील यांनी सांगितले. ते चंदगड तालुक्यातील उत्साळी येथे रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण उद्घाटनावेळी बोलत होते.

पाटील म्हणाले की,  उत्साळी गावासाठी अनेक विकास कामे केली आहेत.  मी आमदार असतांना १९९८ साली हा रस्ता केला होता. त्यानंतर  आता माझ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून रस्ता होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. उत्साळी गाव हे माझे असून लोकांनी मला मनापासून स्विकारल्याचे सांगितले.

भाजपा प्रदेश राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजीराव पाटील यांनी, माझी ओळख नसताना देखील आपल्या गावाने गेल्या विधानसभेला मला भरघोस मतदान केले आहे. त्याचे ऋण येत्या काही दिवसात गावच्या विकासकामांतून फेडणार असल्याचे सांगितले.                             

सचिन बल्लाळ म्हणाले की, गावच्या मागणीनुसार अडकूर ते उत्साळी रस्त्यासाठी ५९ लाखांचा निधी आणण्यात मला यश आहे. येथून पुढे अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळावी, असे मत व्यक्त केले.                               

यावेळी पं.स. सदस्य बबन देसाई, अॅड. विजय कडुकर, चंदगड नगरसेवक दिलीप चंदगडकर, जिल्हा सरचिटणीस रवि बांदीवडेकर, उदय देशपांडे, मुरली बल्लाळ, विजय गावडे, पुंडलिक दळवी, रामराव देसाई, अनिल वाईगडे, नाना देसाई, अनिल देवळी, राजाराम आंबुलकर, शिवाजी आपटेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.