ढोंगी धनंजय मुंडे यांना शिक्षा मिळणार..! : रेणू शर्मा

0
190

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या एका तरूणीने बलात्काराची तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपांचे खंडन केल्यानंतर रेणू शर्मा हिने मुंडेंवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. ढोंगी धनंजय मुंडे यांना शिक्षा मिळणारच, असे रेणू शर्माने ट्विट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील  आणखी ट्विस्ट वाढले आहे.

मागील काही दिवसांपासून ट्विटर तसेच इतर ठिकाणांवर रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी ब्लॉक का केले होते ?, मात्र मी रिपोर्ट केल्यावर लगेच मला अनब्लॉक केले, असेही रेणू शर्माने म्हटले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास झाल्यानंतर सर्व काही समोर येईलच, असा विश्वास व्यक्त करून ट्विटमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.