लिप्ट देण्याचा बहाणा करुन वृद्धेला लुटणाऱ्या पती-पत्नीला अटक…

0
387

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील वयोवृद्ध महिलेला १६ नोव्हेंबर रोजी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीतून नेवून लुटणाऱ्या परराज्यातील दांपत्याला आज (मंगळवार) कोल्हापुरात सापळा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलं. सलमान मुबारकखान तांबोळी (वय २९) आणि पत्नी आयेशा सलमान तांबोळी (वय २४, दोघे रा. शिवजल सिटी नाईक बोमवाडी ता.फलटण) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर पेरीड नाका येथून १६ नोव्हेंबर रोजी वयोवृद्ध महिला मंगल कुंभार यांना लिफ्ट देण्याचा बहाणा करून या पती-पत्नीने चारचाकी वाहनातून नेले. तसेच जीवे मारण्याची धमकी देवून दागिने, मोबाईल काढून घेवून केर्ले फाट्यावर सोडून देऊन पलायन केले होते. याप्रकरणी शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या अनुषंगाने तपास सुरू असताना ही चोरी केलेले दांम्पत्य आज कोल्हापुरात मणेर मळा उचगाव येथे आयेशाच्या वडिलांकडे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांनी मिळाली होती.

त्यानुसार या परिसरात पोलीसांनी सापळा लावून ही कारवाई करत त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेले सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी असा ३ लाख ११ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या आरोपींना शाहूवाडी पोलिस ठाण्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमंलदार आसिफ कलायगार,सुरेश पाटील, रामचंद्र कोळी,विनोद कांबळे,अनिल जाधव,वैशाली पाटील, रणजित पाटील,संतोष पाटील,अमर वासुदेव,सुरेश राठोड यांनी केली.