हुपरी पोलिसांचा बेशिस्त वाहनधारकांना दणका…

0
95

हुपरी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला.

आज (शुक्रवार) हुपरी ते कोल्हापूर मुख्य रस्त्यावरील सुभाष चौकात लावलेल्या २० ते २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. शहरात वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक अडथळे येत आहेत. यापुढे मुख्य रस्त्यावर पार्किंग केलेले आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिला.