केळोशी बुद्रुकच्या उपसरपंचपदी वसंत जाधव बिनविरोध

0
132

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रुकच्या उपसरपंचपदी वसंत गणपती जाधव यांची आज (बुधवार) बिनविरोध निवड करण्यात आली. आनुबाई बळवंत किरुळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर लोकनियुक्त सरपंच के.एल. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी दिपक बागडी यांनी काम पाहिले.

सरपंच के. एल. पाटील म्हणाले की, केळोशी गावाबरोबरच दहा वाडी वस्तीत विभागलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक वाडीतील सदस्यांना पद मिळावे, ही अपेक्षा आहे. परंतु पदसंख्या आणि मिळणार कार्यकाळ यामुळे या पदावर नियुक्ती करताना गावचा प्रमुख या नात्याने अनेक अडचणी येतात. परंतु सर्व सदस्यांच्या सहकार्याने यावेळी चौथ्या सदस्यांना उपसरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली आहे. यावेळी सर्व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.