भाजप ग्रामीण कामगार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी विक्रम मोहिते

0
86

करवीर (प्रतिनिधी) : वळीवडे (ता.करवीर) येथील विक्रम यशवंतराव मोहिते यांची भाजप जिल्हा ग्रामीण कामगार आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. वळीवडेचे ते ग्रामपंचायत सदस्य असून कामगारांसाठी बजावलेल्या कर्तव्यपूर्तीची पक्षाच्यावतीने दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली. कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव साने यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.