मोठ्या नेत्याला परत आणण्याची जबाबदारी पी. एन. पाटलांवर..!(व्हिडिओ)

0
509

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते कल्लाप्पांना आवाडे तसेच प्रकाश आवाडे यांचे काँग्रेस पक्षाशी ५० वर्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. पक्षात त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह मी मध्यंतरी आवाडे यांची भेट घेतली आहे.  विविध पक्षाच्या वतीने आवडे यांच्या भेटीगाठी सुरू असतात. मात्र त्यांनी अजून भाजपत जाण्याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.काँग्रेसमध्ये त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षानेच आमदार पी. एन. पाटील यांच्यावर आवाडे यांना पक्षात घेण्याची जबाबदारी दिली असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था देण्याचे काम सुरू आहे. केंद्र, राज्य यामध्ये पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात देखील काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करत आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत किंवा केंद्रीय कार्यकारिणीत बदल करण्याबाबत सध्यातरी कोणतीही चर्चा नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनस्वराज्य पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे यांना सोबत घेण्याबाबत अद्याप ही आपली चर्चा झालेली नाही. लवकरच कोरे यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही पाटील यांनी सांगितले.