मंत्री यड्रावकरांना रोखले (व्हिडिओ)

0
784

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात निघालेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटकच्या सीमेवर अडवण्यात आले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी त्यांचा ताफा रोखल्याचे समजते. यावेळी राजेंद्र पाटील- यड्रावकर आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर यड्रावकर यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. त्यामुळे आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत आहेत. अशावेळी राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क नाकारला जात आहे. आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.