पिशवी येथे मुलींना निर्भया पथकाकडून मार्गदर्शन  

0
171

बांबवडे (प्रतिनिधी) : मुलींनी छेडछाड करणाऱ्यांविरोधात भीती बाळगू नये. धाडसाने प्रतिकार करून असे काही प्रकार घडत असल्यास तत्काळ पोलिसांच्या निर्भया पथकाशी संपर्क साधवा, असे आवाहन शाहूवाडी निर्भया पथकाच्या प्रमुख व सहायक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांनी आज (मंगळवार) केले.

पिशवी (ता.शाहूवाडी) येथे मा. खा. उदयसिंगराव गायकवाड हायस्कूल आणि युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील यांच्या वतीने शालेय मुलींसाठी निर्भया पथक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी पाटील यांनी मुलींना संकटप्रसंगी स्वत:चे संरक्षण कसे करावयाचे याबाबत धडे दिले. यावेळी मुख्याध्यापक टी.जे.कांबळे, सहायक शिक्षक आनंदा इंगवले, व्ही.एस.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. के.के. चौगुले यांनी प्रास्ताविक केले. दीपक धोंडफोडे यांनी आभार मानले. यावेळी रामचंद्र सुतार, संजय मोरे आदीसह  विद्यार्थी व विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.