शिरोळ (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. परंतु  नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून सतर्क राहिले पाहिजे. व काळजी घेतली पाहिजे. घरगुती वीजबिलात तरतूद करण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. तसेच नियमित वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होणार नाही, या चीही दखल घेतली जाईल, असे शिवसेना प्रवक्ते  व खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट केले. शिरोळ तालुक्यातील दानोळी गावाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.   

खा. धैर्यशील माने म्हणाले की, दानोळी गावाचा  विकास आराखडा तयार करा. तो पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. तसेच महापूर,  कोरोना यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रयत्न करत आहे.

यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  महादेव धनवडे,  बापूसो दळवी  यांनी  समस्या मांडून मनोगत व्यक्त केले. सतीश मलमे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील,  तालुका प्रमुख वैभव उगळे, सर्जेराव शिंदे, सीताराम माने, जनार्धन लोहार, रामचंद्र वाळकुजे, सुनील शिंदे,   ग्रा.पं. सदस्य आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. गुंडू दळवी यांनी  आभार मानले.