एचआरसीटी आता दोन हजारांत : राज्य शासनाचे दर निश्चित

कोल्हापूर : राज्य शासनाने एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित केले आहे. त्यानुसार १६ पर्यंत स्लाईसच्या मशीनवर चाचणीकरिता २ हजार रुपये तर १६ ते ६४ स्लाईसच्या मशिनवरील चाचणीकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ ते २५६ स्लाईसच्या मशीनवरील चाचणीसाठी ३ हजार रुपये असे दर निश्चित केले आहेत.

कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करुन नियुक्त केलेल्या समितीने राज्यातील विविध खाजगी रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांशी समन्वय साधावे. यामध्येच सी. टी. स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल, सी. टी. फिल्म, पी. पी. ई. किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जी. एस. टी. चा समावेश आहे.

डॉक्टरच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय एचआरसीटी करण्याची मागणी नागरिकांडून करण्यात येत आहे. या तपासणीमध्ये किरणोत्सर्जनद्वारे तपासणी असल्याने जोखीम आहे. यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन्स शिवाय ही तपासणी करु नये. एचआरसीटी तपासणी करणाऱ्या रेडीओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे आवश्यक राहील. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा योजना आहे, किंवा एखादया रुग्णालयाने किंवा कार्पोरेट, खाजगी आस्थापनेने जर एचआरसीटी तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल, त्यासाठी हे दर लागू असणार नाहीत.

सर्व रुग्णालये तपासणी केंद्र यांनी एचआरसीटी तपासणीसाठी निश्चित केलेले दर (मशिन च्या प्रकारानुसार) दर्शनी भागात लावणे, निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे गरजेचे आहे. निश्चित दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी व जिल्हा स्तरावर (महानगरपालिका क्षेत्र वगळून) संबंधित जिल्हाधिकारी, संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त सक्षम प्राधिकारी राहतील. ही दर आकारणी साथरोग कायदयांची अंमलबजावणी असेपर्यंत चालू राहतील.

Live Marathi News

Recent Posts

कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…

3 hours ago

महिला दिनानिमित्त अंध भगिनींसाठी जेऊर येथे आगळा उपक्रम

पन्हाळा (प्रतिनिधी) : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर…

4 hours ago