अजून किती गळे दाबणार आहात? कंगणाचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल   

0
43

मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर विरोधकांकडून सरकारविरोधात प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. यात आता अभिनेत्री कंगना राणावत हिनेही उडी घेतली आहे. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात?  किती तोंडं बंद करणार आहात? असा सवाल करत कंगनाने ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे.

मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात?  किती आवाज बंद करणार आहात?

सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील, असेही तिने म्हटले आहे. पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का ?  तुम्ही आहात सोनियासेना, अशीही टीका कंगनाने केली आहे.