कतार : फिफा विश्वचषक २०२२ स्पर्धेत यजमान कतारला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. कतार आणि सेनेगल यांच्यामधील सामन्यात कतारला पराभव पत्करावा लागला आहे. सलामीच्या सामन्यातही यजमान कतारचा इक्वेडोरने पराभव केला होता.

त्यानंतर आता सेनेगल विरुद्धचा सामनाही कतारला जिंकता आलेला नाही. सेनेगलने कतारला ३-१ ने हरवले. दोहा येथील अल थुमामा स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. सलग दुसऱ्या पराभवामुळे यजमान कतारचे पुढील फेरीत जाण्याचे स्वप्नही भंगले असून, कतार स्पर्धेबाहेर गेले आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सेनेगलने कतारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि पहिल्या १० मिनिटांत आक्रमक खेळी करत २-३  वेळा गोल करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या अर्ध्या तासामध्ये सेनेगलचा संघ अधिक वरचढ होता. सेनेगलने कतारला आक्रमणासाठी खूप कमी संधी दिल्या. ४१ व्या मिनिटाला पहिला गोल करताना सेनेगललाही आक्रमण सुरू ठेवले. कतारच्या गोलरक्षकाला बॉल क्लिअर करता आला नाही आणि स्ट्रायकर बुलाए डियाने अप्रतिम गोल केला.