Published September 19, 2020

कोल्हापूर : महाड येथील इमारत दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या व्हाईट आर्मी, NDRF, तसेच इतर सेवाभावी संस्थाचा पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकरी निधी चौधरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, तहसिलदार सुरेश काशीद आदि उपस्थित होते.

पालकमंत्री तटकरे म्हणाल्या, ‘नैसर्गिक आपत्तीच्या काळात महाड दुर्घटनेत बचाव कार्यासाठी व्हाईट आर्मी टीम कोणतेही पाचारण नसताना तिथे लवकरात लवकर हजर राहिली व काम केले हे खूप कौतुकास्पद आहे. महाड येथील इमारत दुर्घटनेत बचावकार्यासाठी मदत केलेल्या व्हाईट आर्मी संस्था तसेच एनडीआरएफचे जवान, आणि इतर कर्मचारी यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.’

 

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023