कोगे येथे कोरोना योध्दांचा सन्मान

0
65

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कोगे येथील जेष्ठ सहकार नेते  कै. दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या विसाव्या  स्मृतीदिन  कोरोना योद्ध्यांच्या सत्काराने साजरा करण्यात आला.

कोगे गावचे ज्येष्ठ व काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ असणारे कै. दत्तात्रय पांडुरंग पाटील. सामाजिक क्षेत्रात व राजकीय कारकिर्दीमध्ये  यांनी अनेक पदे भूषवली होती. शिक्षण कमी पण उच्च विचाराच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

कार्यक्रमात बोलतांना, कुंभी कासारी साखर कारखान्याची सदस्य प्रकाश कुंडलिक पाटील म्हणाले, कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीने सर्वत्र हाहाकार माजला आहे. आरोग्य सेवक व सेविका, आशा मदतनीस, अंगणवाडी सेविका, शिक्षक, डॉक्टर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांनी आपला जीव मुठीत घेऊन समाजाची सेवा केली. अशा लोकांचा सत्कार करणे हे माझे भाग्य समजतो ,

यावेळी बोलतांना गोविंद मोरे म्हणाले शांत संयमी स्पष्ट सडेतोड व नि:पक्षपणे काम करणारे ते गावचे भुषण होते.  या कार्यक्रमात आरोग्य सेवक  रवींद्र कोळी, आरोग्य सेविका  साधना सूर्यवंशी, तंटामुक्त अध्यक्ष  गणपती मिठारी, ग्रामविकास अधिकारी डि के आंबेकर, तलाठी  पी आर ठाकूर, पोलीस पाटील दत्तात्रय मिठारी, डॉ. केदार पाटील, डॉ.बाजीराव पाटील, डॉ.कुलदीप मरळकर, डॉ.भरत घंगरगोळे,   डॉ. राजकुमार पावसकर, पत्रकार निलेश जाधव, प्रकाश पाटील, विश्वनाथ मोरे ,बाजीराव तळेकर, मच्छिंद्र मगदूम, शिवराज लोंढे यांच्यासह जवळपास ६२ कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांना शील्ड, सर्टिफिकेट,  देऊन एका अनोख्या स्वरूपात स्मृतीदिन  साजरा केला.

यावेळी माजी सरपंच रवींद्र वेदांते, उपसरपंच विश्वास पाटील,  बाबुराव कांबळे,विकास पाटील, सौरभ पाटील,दत्तात्रय मांगोरे, शिवाजी डाफळे, शुभम पाटील, हरीश घराळ, विलास वाडकर, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन विश्वनाथ मोरे, स्वागत डॉ. संतोष पाटील व आभार डॉ. विलास पाटील यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here