हमिदवाडा (प्रतिनिधी)  : परिवर्तन  सामाजिक संस्थेच्या वतीने १० वी उत्तीर्ण झालेल्या पहिल्या ३ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३, २ व १ हजार रुपये असे रोख बक्षीस,  गौरव प्रमाणपत्र,  परिवर्तन दिनदर्शिका व एक पुस्तक भेट देऊन हा गौरव केला जाणार आहे.  हा कार्यक्रम कौलगे येथील शिवराज विद्यालयात  रविवारी (दि.१५) होणार आहे.

यावेळी चिखली हायस्कूल चिखली, यशवंतराव भोसले विद्यालय खडकेवाडा, न्यू इंग्लिश स्कूल सदाशिव नगर, हमीदवाडा,  कॉ. जीवनराव सावंत श्रमिक विद्यालय बाणगे,  महात्मा फुले विद्यालय आनुर,  सदाविजय माध्यमिक विद्यालय म्हाकवे व म्हाकवे न्यू इंग्लिश स्कूल म्हाकवे या शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

परिवर्तन  सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शिवराज  भोसले-पाटील व संस्थेचे मुख्य कृतिशील मार्गदर्शक व संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार (पुणे)  यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम  गेल्या ८ वर्षांपासून राबविण्यात येत आहे.