कळे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय ज्ञानू पाटील (रा. कोतोली, ता. पन्हाळा) यांना दिल्ली येथील एल्फस राज्य सरकार विश्वविद्यालयाच्या वतीने ऑनररी डॉक्टरेट पदवी देऊन गौरविण्यात आले.

संजय पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून केलेल्या विविध  सामाजिक कार्याने प्रभावित होऊन त्यांना ‘सोशल वर्क’मध्ये ऑनररी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी कुलगुरु डॉ. अंजु भंडारी, रजिस्ट्रार डॉ. के. डी. आर्या, डॉ. सबबी मंगल,  कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.