कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील मंडलिक वसाहत येथील ऑनररी कॅप्टन आप्पासाहेब शिवराम नलवडे (वय ८५) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.

१९७१ च्या भारत-पाक युध्दात अशोक पिकेटवर तिरंगा ध्वज फडकाविण्यात त्यांच्या युनिटचे मोलाचे योगदान होते. स्वातंत्र्याच्या अमृतसोहळ्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर पाहिल्या नंतरच त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मूळ गाव बुधलमुख पांगिरे (ता. चिक्कोडी) हे असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे अस परिवार आहे.