टोप (प्रतिनिधी) :  टोप संभापूर येथे सचिन परीट यांचे मुळे त्यांच्या श्री गणेश वाशिंग इस्त्रीचे दुकान आहे. या दुकानात हिंदुराव मुळीक यांचे कपडे इस्त्रीसाठी आली होती. या कपड्यामध्ये सचिन यांना १० हजार रुपये सापडले. ते पैसे सचिन आणि विनोद परीट यांनी मुळीक यांना प्रामाणिकपणे परत केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गावातील नागरीकांनी त्यांचा सत्कार केला.