गृहमंत्र्यांचा दणका : भाजपने रक्षा खडसेंबाबतचा आक्षेपार्ह उल्लेख हटविला   

0
121

मुंबई  (प्रतिनिधी) : भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर  रावेरच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत चुकीचा उल्लेख केल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर    अवघ्या १२ तासांमध्ये भाजपने ही चूक मान्य करत यात सुधारणा केली.  

भाजप खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला होता. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. मात्र, रक्षा खडसे यांच्या मतदारसंघ रावेरचा उल्लेख करताना या वेबसाईटवर ‘होमोसेक्शुअल’ असे लिहिल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला होता. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा आक्षेपार्ह शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून भाजपला असभ्य उल्लेख हटविण्यास सांगितले.